छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो)
महानगरपालिका निवडणूक संपल्यानंतर विजयी झालेल्या नगरसेवकांविरोधातील विविध गंभीर तक्रारींचा पाऊस पडला असला, तरी गेल्या सहा महिन्यांपासून महापालिका या फायली प्रशासनाकडे धूळखात पडून आहेत. विजयी नगरसेवकांवर तिसरे अपत्य असणे, सरकारी जागांवर अतिक्रमण करणे, विनापरवानगी बेकायदा बांधकाम करणे, निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती देणे आणि महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध करणे यासारखे अनेक गंभीर आरोप तक्रारींद्वारे करण्यात आले आहेत. दरम्यान, 'एमआयएम' ने दिलेल्या इशाऱ्यानंतर भाजपच्या
▶ नगरसेवकांसंदर्भात तक्रारींच्या फाइल्सवरील कार्यवाही विधान परिषद निवडणुकीची आचारसंहितेमुळे थांबलेली होती. नुकतीच ही आचारसंहिता शिथिल झाली असून, या प्रक्रियेला वेग देण्यात येईल. नगरसेवकांच्या तक्रारीच्या सर्व फाइल्स उघडण्यात येतील.
- अमोल येडगे, आयुक्त
दोन नगरसेवकांनी आपले अतिक्रमण स्वतःहून काढून घेतले असले, तरी इतर लोकप्रतिनिधींच्या बेकायदेशीर कृत्यांवर महापालिका आयुक्त कधी आणि काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनपाच्या निवडणुकीनंतर विजयी नगरसेवकांच्या विरोधात पराभूत उमेदवारांकडून विविध तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. सत्ताधारी भाजप, शिवसेना, विरोधी पक्ष एमआयएम पक्षाच्या नगरसेवकांसंदर्भातील
तक्रारींची संख्या अधिक आहे. यात बेकायदा बांधकाम, दोनपेक्षा जास्त अपत्य असणे, निवडणूक शपथपत्रात चूकीची माहिती देणे, अतिक्रमण हटाव मोहीमेला विरोध करणे याचा समावेश आहे. आरोप सिद्ध झाल्यास संबंधित नगरसेवकाचे पद रद्द करण्याची तरतूद आहे. आचारसंहितेमुळे संभाजीनगर-जालना दरम्यान, छत्रपती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने कारवाईला ब्रेक लागला होता.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions