रोहियोची अपूर्ण कामे गतिशीलतेने पूर्ण करा विभागीय आढावा बैठकीत मंत्री भरत गोगावले यांचे प्रतिपादन

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) रोजगार हमीच्या माध्यमातून गोरगरीब लाभार्थी आणि शेतकरी बांधवांच्या हिताला प्राधान्य देऊन सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश रोजगार हमी व फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहामध्ये रोजगार हमी विभागाच्या विविध विकास कामाच्या विभागीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस आमदार रमेश बोरणारे, आमदार विलास भुमरे, रोजगार हमी विभागाचे प्रभारी
आयुक्त तथा जिल्हाधिकारी (लातूर) भरत बास्टेवाड उपसचिव अरविंद पगार, सहसचिव अतुल कोरे, नांदेड जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, छत्रपती संभाजीनगर जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीन्नू, पी.एम, उपायुक्त डॉ. अनंत गव्हाणे आदींची उपस्थिती होती.
मंत्री भरत गोगावले म्हणाले की, सर्व जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या नियंत्रणाखालील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मार्फत काम करून घ्यावे, यासाठी समन्वय ठेवावा वेळोवेळी क्षेत्रभेटी देऊन अपूर्ण कामाचा आढावा घेण्यात
यावा. सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व उपजिल्हाधिकारी या सर्वांच्या समन्वयातून गोरगरीब सर्वसामान्य मजूर आणि शेतकऱ्यांना त्यांच्या विकास कामासाठी मदत व्हावी
या हेतूने काम करणे आवश्यक आहे. तीन महिन्याच्या आत मनेरगाची काम पूर्ण करावेत. केंद्राने दिलेल्या निर्दे शानुसार राज्यातील मनेरगाची कुशल आणि अकुशल चे काम पूर्ण करून उद्दिष्ट साध्य करण्याचे आवाहन गोगावले यांनी संबंधित यंत्रणाला केले. आमदार विलास भुमरे यांनी वेळोवेळी पंचायत समिती स्तरावर कामकाजाचा आढावा घेण्याचे आवाहन संबंधित यंत्रणेला करण्याचे निर्देश देण्यात यावेत अशी सूचना बैठकीत केली तसेच वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांनी अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी उर्वरित निधी शासनामार्फत त्वरित उपलब्ध करून देण्यात यावा.
भोंदू खरातची सखोल चौकशी सुरू
अशोक खरातचे प्रकरण अत्यंत मोठे आहे. हे प्रकरण अगदी हाताबाहेर असल्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह सर्व यंत्रणा याची सखोल चौकशी करीत आहेत. चौकशीत जे काही निष्पन्न होईल खरातला त्या सर्व गोष्टींना सामोरे जावे लागेल, असेही गोगावले यांनी सांगितले.
यामधून विहिरी, शेततळे, मातोश्री पानंद रस्ते, घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून, मजूर मस्टर सुरू करण्याची मागणी बैठकीत केली.