कामाचे पैसे मागितल्याने चालकाला बेल्टने बदडले

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): कामाचे राहिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून हायवा चालकाला बेल्टने मारहाण करून जखमी केल्याची घटना गंगापूर तालुक्यातील धामोरी येथील मुक्तेश्वर साखर कारखान्यासमोर घडली.
याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात रामेश्वर शिवाजी म्हस्के (रा. भगतवाडी, मुर्शिदाबाद, ता. गंगापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सचिन कडुबाळ गायकवाड (वय २३, रा. गुरुधानोरा, ता. गंगापूर) हा हायवा चालक आहे. २९ ऑगस्ट रोजी सकाळी आरोपी रामेश्वर म्हस्के याने गायकवाड
याने याला हायवामध्ये खडी-डबर भरून ट्रिप करण्यास सांगितले. त्यावेळी गायकवाड मुलाच्या उपचारासाठी कामाचे राहिलेले पैसे देण्याची मागणी केली. त्यावर आरोपीने पैसे नंतर देतो, असे सांगितले.
गायकवाड ट्रिप करून मुक्तेश्वर कारखान्यासमोर हायवा थांबवून ग्रीस भरत असताना आला. आरोपी तेथे गायकवाडने पुन्हा पैशांची मागणी केली असता आरोपीने शिवीगाळ करून वाद घातला. त्यानंतर बेल्टने दोन्ही डोळ्यांवर, मानेवर व कानाजवळ मारहाण करून जखमी केले. तसेच पुन्हा पैसे मागितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions