हिंदू एकजुटीसाठी संमेलन आवश्यक : कपाटे

Foto
बिडकीन, (प्रतिनिधी) हिंदू समाजातील एकजूट, कुटुंबव्यवस्थेचे जतन आणि संस्कारांचे संवर्धन यासाठी अशा संमेलनांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. मुनीश्री सुदर्शन नागराजबाबा कपाटे यांनी आपल्या प्रवचनात आई-वडिलांचा सन्मान, कुटुंबातील मुलामुलींमध्ये योग्य संस्कार व विचारांची जपणूक यावर भर दिला. 

युवक-युवतींनी सोशल मीडियाच्या प्रभावापासून सजग राहून जीवनमूल्ये जपावीत, असे त्यांनी सांगितले. समाज संघटन वाढविणे आणि परस्पर सन्मान राखणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बिडकीन येथे आयोजित भव्य हिंदू संमेलन उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडले. संमेलनात संत महंत व विविध मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कुटुंबसंस्कार, समरसता, राष्ट्रभक्ती आणि समाज संघटन यावर विशेष भर दिला. हा कार्यक्रम २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला होता.

सूत्रसंचालन रविंद्र ठाणगे व ज्ञानेश्वर औटी यांनी केले, तर संमेलनाध्यक्ष विजय शेजुळ यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. ह.भ.प. गुरुवर्य कृष्णगिरीजी महाराज (श्री क्षेत्र अंबाऋषी संस्थान) यांनी समाजहिताच्या विविध उपक्रमांची गरज अधोरेखित करत आयोजन समितीचे अभिनंदन केले. राष्ट्रसेवा, धर्मसंरक्षण आणि पर्यावरण संवर्धन यावर त्यांनी मार्गदर्शन केले. इंद्रेश कुमारजी (अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) यांनी भारतमातेचा सन्मान, समरसता आणि सर्वधर्मीयांमध्ये परस्पर आदर राखण्याचे आवाहन केले.
जात-पात, उच्च नीच भेदभाव न करता प्रेमाने जगण्याचा संदेश त्यांनी दिला. नफरत नव्हे, प्रेमाने समाज घडवूया, असे ते म्हणाले.

पर्यावरण रक्षण आणि संस्कारित पिढी घडविण्याचे कार्य संघाच्या माध्यमातून सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. धर्माचार्य साध्वी ह.भ.प. दुर्गा दिदी (कर्मयोगीनी आश्रम, अलियाबाद) यांनी मातृशक्तीचे महत्त्व, इतिहासातील वीरांगनांचा आदर्श आणि कुटुंबसंस्कारांचे जतन यावर भाष्य केले.
युवक-युवतींनी वागावे, समाजहिताचा विचार विवेकाने करावा, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी संमेलनाध्यक्षांचा सर्व संतांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अनिलजी गायकवाड यांच्या "पसायदान'ने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन समितीचे सचिव रुषिकेश आगाज यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे गणेश काळे, संतोष मोदी, बबन काळे, शिवप्रसाद औटी, लहु कातबने, मनोज दौडे, अरविंद शेजुळ, कुणाल पाटील, बाबासाहेब धर्मे, गणेश दाने, गणेश मिसाळ, गौख कुलकर्णी, विष्णू चौधरी, विजय हिवाळे, विजय पडियाल, अविनाश जोशी, अशोक हिवाळे, किरण औटी, रविंद्र गायकवाड, आप्पासाहेब ठाणगे, नवनाथ बांगर, सोमनाथ निनाळे, रविंद्र आगाज आदींसह हिंदू संमेलन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्तेयांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

या संमेलनास ह.भ.प. गुरुवर्य कृष्णाजी महाराज नवले (श्री संत एकनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्था, श्री क्षेत्र पैठण) यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाचे समाप्तीनंतर भव्यदिव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अनुषंगाने महिला व बालक तसेच वयोवृद्ध आणि पुरुषांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. तसेच कार्यक्रम निमित्ताने बिडकीन सह परिसरातील समाजबांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.