माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस कमिटीकडून अभिवादन

Foto
पैठण, (प्रतिनिधी): माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

मंगळवारी रोजी पैठण शहरातील नेहरू चौक परिसरातील काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक हसनोद्दीन कट्यारे यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व. विलासराव देशमुख यांच्या
प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. याप्रसंगी उपस्थितांनी विलासरावजींच्या महाराष्ट्राच्या विकासातील अमूल्य योगदानाचा आणि त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाचा आदरपूर्वक उल्लेख केला.
या प्रसंगी काँग्रेसचे स्थानिक वरिष्ठ पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. 

यामध्ये प्रामुख्याने पैठण तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष रमेश मुळे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक हसनोद्दीन कट्यारे, किशोर दसपुते, संभाजी काटे, जिल्हा सचिव युनुस पठाण, शेखर देशमुख, महेश पवार, अंबादास ढवळे, वसीम गाजी पेंटर, जुनेद गाजी, बाबु जहागीरदार, इरफान गिराम, अल्ताफ शहा, अदनान कट्यारे, बाबा घोरपडे, जावेद सय्यद, खाजा कुरेशी, रियाज गाजी, राहुल मिरपगार यांच्यासह बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून स्व. विलासराव यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.