गंगापूर तालुक्यात मतदार यादीतील दुबार नावे वगळण्याची काँग्रेस पार्टीचे मागणी

Foto
गंगापूर, 
 तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील दुबार नावे वगळण्याची अशी मागणी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष सूर्यकांत गरड व शहरध्यक्ष संदीप दारुंटे व कार्यकर्त्यांनी तहसीलदार नवनाथ वगवाड यांना निवेदन देण्यात आले.

 या निवेदनामध्ये म्हटले आहे की निवडणूक आयोगाने दि. ०८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर केली असून, या याद्यांमध्ये अनेक बुथवर एकाच मतदाराची नावे आढळून येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

गंगापूर अखिल भारतीय काँग्रेस पार्टीवतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “एका मतदाराला एकच मतदानाचा अधिकार असताना, अनेक बुथवर त्याच मतदाराची नावे असणे हे नियमबाह्य असून, अशा प्रकरणांमुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.”
या पार्श्वभूमीवर गंगापूर तालुक्यातील सर्व बुथनिहाय मतदार याद्यांची काटेकोर छाननी करण्यात यावी, तसेच दुबार किंवा अनेक ठिकाणी नोंद असलेली नावे तातडीने वगळावीत, अशी मागणी काँग्रेस पक्ष करण्यात आली आहे. संबंधित नागरिकांनी अशा मतदारांची यादी तयार करून प्रशासनाकडे सादर केली आहे.