पैठण, (प्रतिनिधी): आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी पैठण तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष व नगरसेवक हसनोद्दीन कट्यारे, तालुकाध्यक्ष रमेश मुळे पाटील यांच्या वतीने शनिवारी अभिनंदन कार्यालय येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जालन्याचे खासदार डॉ. कल्याणराव काळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांची विशेष उपस्थिती लाभली होती.
लोकशाही टिकवण्यासाठी आणि पक्षाची विचारसरणी तळागाळातील सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक बूथ मजबूत असणे आवश्यक आहे. बूथ लेव्हल एजंट्स (१ व २) यांनी पक्षाचा कणा म्हणून काम करावे.
तुकाराम रेंगे पाटील काँग्रेस पक्ष प्रभारी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी आपल्या भाषणात संघटनात्मक एकजुटीवर भर दिला. मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, नवीन मतदारांची नोंदणी करणे आणि स्थानिक पातळीवरील
नागरी समस्यांवर आक्रमकपणे आवाज उठवणे, यावर त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
सत्ताधारी पक्षाच्या धोरणांवर टीका करत काँग्रेस कार्यकर्त्यांना जनतेच्या थेट संपर्कात राहण्याचे आवाहन केले.
वरिष्ठ काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांच्या सुचनेनुसार चा शहरातील १२ प्रभागातील ३६ बुथचा आढावा सादर केला असल्याचे पैठण शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक हसनोद्दीन कट्यारे यांनी सांगितले.












