जिल्हानिहाय परशुराम भवनची उभारणी : कॅप्टन आशीष दामले

Foto
छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्युरो): राज्यात प्रत्येक जिल्ह्यात परशुराम भवनची उभारणी करण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये परशुराम भवनसाठी जागा ताब्यात घेतली आहे. त्याचे भूमिपूजनही करण्यात आले आहे. वेदाध्यन, पौरोहित्य शिकणाऱ्या वेदोपासकांना (विद्यार्थी) शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. जिल्हानिहाय परशुराम भवनची उभारणी करण्यात येईल, तर पौरोहित्य करणाऱ्यांना विमा कवच आणि निवृत्ती वेतनही देण्याचाही प्रयत्न असल्याचे सांगितले.
परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशीष दामले यांनी महामंडळाच्या माध्यमातून महिलांसाठी २० लाखांपर्यंतचे कर्ज देणारी रमाबाई रानडे बचतगट अर्थसहाय्य योजना
राबवण्यात येणार असल्याची माहिती शुक्रवारी येथे दिली. अलिकडच्या काळात जे १७ ते १८ महामंडळे स्थापन झाली. मराठवाडा दौऱ्यावर आलेले कॅप्टन दामले यांचा शुक्रवारी पिसादेवी येथे सकल ब्राह्मण वर्गाच्या वतीने सत्कार करण्यात आला. महामंडळाच्या विविध योजना तयार करण्यात येत असून, त्यामध्ये वैयक्तिक स्वरुपातील १५ लाखांपर्यंतच्या कर्जाचा व्याज परतावा, ५० लाखांच्या गटकर्जाचा व्याज परतावा देण्याचा समावेश आहे. विभाग आणि जिल्हानिहाय उभारण्यात येणाऱ्या परशुराम भवनमध्ये आर्थिक परिस्थिती जेमतेम असणाऱ्या समाजातील वर्गाला मौंज, लग्नकार्य करता येणार आहे. समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे.