पाळखीवरून पडल्याने बांधकाम मजूर गंभीर जखमी

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): बांधकाम ाच्या ठिकाणी सुरक्षेची आणि लाकडी पाळखीची (स्कॅफोल्डिंग) पाहणी करण्यात हयगय केल्यामुळे पाळखीवरून पडून एक बिगारी कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना हयात हॉटेलच्या पाठीमागे घडली. अपघातानंतर उपचाराचे पैसे मागितले असता काम गाराला धमकावणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू शेषराव हिवराळे (वय ४०, रा. आंबेडकर नगर, छत्रपती संभाजीनगर) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी
त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ठेकेदार विष्णू तांबे (वय ४५, रा. बायपास रोड, छत्रपती संभाजीनगर) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
११ जून रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास राजू
हिवराळे हे हयात हॉटेलच्या पाठीमागे अभिषेक तायल यांच्या घराच्या बांधकामावर काम करत होते. ठेकेदार विष्णू तांबे याने बांधकामासाठी बांधलेल्या लाकडी पाळखीची योग्य पाहणी न करता निष्काळजीपणा केला होता. राजू हे पाळखीवर काम करत असताना अचानक पाळखीवरून खाली कोसळले. या अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions