अजिंठा घाटात ब्रेक निकामी झाल्याने कंटेनर डोंगराला धडकला

Foto
सुदैवाने जिवीत हाणी टळली

सिल्लोड, (प्रतिनिधी) : राजमा घेऊन जाणाऱ्या कंटेनरचे ब्रेक अजिंठा घाटात निकामी झाल्याने कंटेनर डोंगराला जाऊन धडकल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला तर अपघातामुळे घाटात वाहतूक व्यवस्था खोळंबली होती. फर्दापूर पोलीसांनी येऊन ही वाहतूक सुरळीत केली.
सोमवारी सकाळी बीड येथुन कंटेनर (क्र. आर. जे. ११ जि. सी. १३०३) १९ टन राजमा दिली येथे घेऊन जात होता. दुपारी तो चार वाजेच्या सुमारास आजिंठा घाटात येऊन घाट उतरत असतांना कंटेनरचे ब्रेक निकामी झाले यामुळे चालकाचा
ताबा सुटला. व कंटेनर डोंगराला जाऊन धडकून हा अपघात झाला. कंटेनरमधील चालक रामनिवास कुशवा (वय ४०) रा. धौलपूर, राजस्थान व क्लिनर अनिल ठाकुर (वय ३८) रा. धौलपूर, राजस्थान हे दोघे बालंबाल बचावले.

या अपघातात कंटेनरचे मोठे नुकसान झाले आहे, कंटेनर मोठा असल्याने बाजुने मोठ्या गाड्यांना जाण्यास अडथळा निर्माण होत होता. यामुळे अजिंठा घाटात एक तास वाहतुक ठप्प झाली होती व दोन्ही बाजुने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. फर्दापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी फिरोज तडवी हे ग्रहरक्षक दलाचे जवान घेऊन दाखल झाले व वाहतुक व्यवस्था सुरळीत केली.