भेंडाळा फाट्यावर भरधाव कंटेनर उलटला; चालक गंभीर

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर महामार्गावरील भेंडाळा फाटा येथे रविवारी (दि. ५) संध्याकाळी ८ वाजण्याच्या सुमारास भरधाव कंटेनरचा पाठीमागील टायर अचानक फुटल्याने कंटेनर महामार्गावरील दुभाजकावर चढून पलटी झाल्याची घटना घडली. 

या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातातील जखमी चालकाचे नाव एकनाथ सतीश चव्हाण (३२, रा. घोटका, ता. लोहा, जि. नांदेड) असे आहे. कंटेनर (क्र. डीडी ०१ एजे ९६७७) हा अहिल्यानगरहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात होता. प्राथमिक माहितीनुसार, कंटेनरच्या वाहनावरील नियंत्रण सुटले. 

त्यानंतर मागील बाजूचा टायर अचानक फुटल्याने कंटेनर दुभाजकावर चढून पलटी झाला. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत चालकाला व तातडीने बाहेर काढले खाजगी रुग्णवाहिके द्वारे गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे काहीकाळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली.