जिल्हयातील ११० गावांमध्ये दूषित पाणी : साथरोगाचा धोका

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो) जिल्हा परिषद आरोग्य विभाग व ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामीण भागातील पाणी स्त्रोतांच्या नमुन्यांच्या आलेल्या अहवालानुसार जिल्हयातील ११० गावांतील स्त्रोतातील पाणी दूषित असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, या दूषित पाण्यामुळे संबंधित गावांना साथरोगाच्या धोका निर्माण झाला आहे.

तांडा, सताळा, मोरहिरा, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील २३ गावांतील स्त्रोतातील पाणी दूषित असून, भिंदोन तांडा, खोडेगाव, आपतगाव, चिंचोली, चित्तेपिंपळगाव, रहाटपट्टी लिंगदरी. फुलंब्री तालुक्यातील गणोरी, गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद खराडी, गवळी शिवरा, वसुसायगाव, रायपूर, धामोरी, आसेगाव, पांढरओहळ अशा २५ गावांतील पाणी दूषित आहे. कन्नड तालुक्यामध्ये अशा प्रकारची १४ गावे आढळून आली आहेत.

यामध्ये ताडपिंपळगाव, चिंचोली, आलापूर, लामनगाव, सोनवाडी आदी गावांचा समावेश आहे. रत्नपूर तालुक्यातील २० गावे आढळून आले आहेत. यांमध्ये दरेगाव, रेल, बोडखा, खिर्डी, गदाना, म्हैसमाळ, कसाबखेडा, पळसवाडी, आखतवाडा या गावांचा समावेश आहे. पैठण तालुक्यातील गेवराई खु., रहाटगाव, धनगाव, नारायणगाव, नवगाव, आपेगाव यांच्यासह ११ गावे यांमध्ये असून, सिल्लोड तालुक्यातील हळदा, वडाळा, तळवाडा, पिंपळदरीवाडा या ४ गावांचा समावेश आहे. 

सोयगावमधील ठाणा, टिटवी, तर वैजापूर तालुक्यातील शिवूर, जळगाव, करंजगाव, सिरसगाव, सटाणा, वाघलगाव, भग्गाव, पानवी खंडाळा या १० गावांचा समावेश आहे.