वैजापूर, (प्रतिनिधी) वीस वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला तालुक्यातील करजगाव येथील करजगाव ते हडसपिपळगाव हा माळवाट रस्ता अखेर लोकसहभागातून मोकळा करण्यात आला असून परिसरातील नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
मंडळ अधिकारी रीता पुरी यानी या कामात लक्ष घालून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला. संबंधित रस्त्यातर काही जमीन वाद, अतिक्रमण आणि मालकी हक्कांबाबत मतभेद होते, त्यामुळे हा रस्ता होण्यास अडथळे निर्माण न होत होते. गेल्या काही महिन्यापासून करजगाव व हडसपिंपळगाव या 5 दोन्ही गावात बैठका घेऊन रिता पुरी यांनी रस्त्या बाबत चर्चा केली. या रस्त्यावर दोन गावातील शेतकऱ्यांचा सबंध होता.
समन्वय नसल्याने नवादामुळे रस्ता बंद होता.
प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही बाजू मध्ये समन्वय साधण्यात आला. अखेर नागरिकांनीच स्वखर्चाने आणि श्रमदानातून रस्ता मोकळा व करण्याचे ठरवले. अखेर सर्वांच्या सहमतीने अडथळे दूर करण्यात आले. आणि रस्ता तयार करण्यात आला. याच शेतकऱ्याऱ्यांच्या मदतीने तीस फूट रस्ता लोकसहभागातून झाडे झुडपे काढून मोकळा केला.
सलग तीन दिवस हे काम चालले. गेल्या २० वर्षांचा वाद मिटल्याने शेतकऱ्यानी समाधान व्यक्त केले. त्यांनी प्रशासनाचे आभार मानले. मंडळ अधिकारी रिता पुरी, तलाठी प्रवीण पाटील, प्रवीण या उपक्रमामुळे शेतकऱ्याऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यास सोय झाली असून विद्यार्थ्यांनाही शाळेत जाणे सुलभ झाले आहे. ग्रामस्थानी हा लोकसहभागाचा आदर्श नमुना असल्याचे सांगितले. प्रशासनानेही नागरिकाच्या एकजुटीचे कौतुक करत अशा उपक्रमाना प्रोत्साहन देण्याचे आश्वासन दिले आहे. दिलवाले, कल्पना घायसमुद्रे, अशोक नळे यांनी हे काम मार्गी लावले.