नगर परिषद निवडणूक लढण्यास काँग्रेस सज्ज
सिल्लोड, (प्रतिनिधी) : आगामी सिल्लोड नगर परिषद निवडणूकसाठी काँग्रेस पक्ष सज्ज असून पूर्ण ताकदीने सिल्लोड नगर परिषद निवडणूक लढणार असून महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढणार आहे. असे नमूद करीत जर महाविकास आघाडी सिल्लोडमध्ये होत नसेल तर स्वबळाची तयारी ठेवा, असे आवाहन सिल्लोड सोयगाव विधानसभा प्रभारी डॉ. जफर खान यांनी कार्यकर्त्यांना केले.
यावेळी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अनिस पटेल, शहराध्यक्ष शेख फेरोज, अल्पसंख्याक जिल्हा चिटणीस कैसर आझाद, ज्येष्ठ नेते शांतीलाल अग्रवाल, महिला तालुकाध्यक्ष जिजाबाई अंभोरे, मागासवर्गीय जिल्हा उपाध्यक्ष देविदास दांडगे, युवक अध्यक्ष जाबेर पठाण, युवन विधानसभा अध्यक्ष आवेस आझाद, अशपाक पठाण, अनवर पटेल, रोहित नाटेकर, शेख शोएब, सुनील आरके, शेख रईस, शेख तौसिफ, शेख सोहेल, गणेश आरके, शेख साजिद, शेख जुबेर, सद्दाम खा, संदीप आरके, सुरेश आरके, विजय डोके, सतीश म्हस्के, अमोल म्हस्के, मिलिंद आरके, सय्यद नदीम, समीर पठाण, इम्रान पठाण, शेख जुनेद, शेख वाजेद यांची उपस्थिती होती.
सिल्लोड येथील शासकीय विश्राम गृहात सिल्लोड शहर काँग्रेस कार्यकर्ता व पदाधिकाऱयांची आढावा बैठक डॉ जफर खान यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थच्या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली. काँग्रेसनेही याबाबत आपली तयारी करण्यासाठी ही कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आगामी सिल्लोड नगर पालिका निवडणुकीची रणनीती ठरवविण्यात आली. आगामी निवडणूक काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने लढणार असून सिल्लोड शहराच्या इतिहासातील एक वेगळाच निकाल देणारी निवडणूक असणार आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले जनआंदोलन आणि वोट चोरीचा प्रश्न जनतेला १०० टक्के पटला. लोकशाही वाचवण्यासाठी तसेच शहराचा विकास करण्यासाठी काँग्रेस ही निवडणूक लढणार आहे. काँग्रेसचे विचार घराघरात पोहचवा असे प्रतिपादन डॉ. जफर खान यांनी यावेळी केले. या बैठकीला सर्व काँग्रेसप्रेमी, कार्यकर्ते, आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
















