अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत कॉर्नर बैठक

Foto
सिल्लोड (प्रतिनिधी) : शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अब्दुल समीर अ. सत्तार यांच्या प्रचारार्थ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर भागात आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉर्नर बैठक पार पडली. या बैठकीला येथील रहिवासीयांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

महिला व युवकांचे मजबूत संघटन तयार करा, भूल थापांना बळी पडू नका, निवडणुका काही दिवसांत जाहिर होतील.
त्यानंतर नगरसेवक पदासाठी उमेदवारी जाहीर होईल असे स्पष्ट करीत शहर विकसित ठेवण्यासाठी शिवसेना उमेदवारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी केले. दरम्यान सिल्लोड नगर परिषद निवडणुकीत अब्दुल समीर अ. सत्तार यांना राज्यात सर्वप्रथम शिवसेना पक्षातर्फे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर वासीयांच्या
वतीने अब्दुल समीर यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी नंदकिशोर सहारे, माजी नगराध्यक्ष राजश्री निकम, महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर अग्रवाल, जिल्हा संघटक सुदर्शन अग्रवाल, शहर प्रमुख मनोज झंवर, विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, माजी उपनगराध्यक्ष विनोद मंडेलेचा, रउफ बागवान, प्रशांत क्षीरसागर, अकिल वसईकर, शेषराव आरके, उत्तम आरके, सोमा आरके, संजय आरके, जितू आरके, राजेश्वर आरके, मनोहर आरके, तेजराव आरके, धम्मा दांडगे, बबलू पठाण, जुम्मा का पठाण, शेख मोहसीन, मोहंमद हनीफ, सत्तार हुसेन, शेख इमरान, शिवा टोम्पे, फहिम पठाण, मोईज शेख, डॉ. फिरोज खान, रखी गायकवाड, अली मौलाना मोईन पठाण, पंडित आरके, पांडुरंग आरके, प्रकाश आरके आदिंसह महिला भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.