कोरोना अपडेट; आणखी ९० रुग्णांची वाढ

Foto
 जिल्ह्यात आणखी ९० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही ८९७२ वर जाऊन पोहचली आहे. 

आज दुपारनंतर ९० रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे आतापर्यंत ८९७२ कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी ५२२९ बरे झाले, तर आतापर्यंत ३६२ जणांचा मृत्यू झाला. तर ३३८१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
यामध्ये सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये २ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 
*शहरात २५ रुग्ण*
शहरात २५ रुग्ण आढळून आले. त्यात एन दोन, हडको १, एन चार सिडको ४, गांधी नगर १, कॅनॉट प्लेस १, ज्योती नगर १, माऊली तरंग १, भारत नगर २, जाफर गेट १, क्रांती नगर १, सेना नगर, बीड बायपास १, शाहिस्ता कॉलनी १, नवनाथ नगर १, विवेकानंद नगर २, सिल्क मिल कॉलनी १, नगारखाना, गुलमंडी १,घाटी परिसर १, इतर ४ या भागात रुग्ण आढळून आले. 
*ग्रामीण भागात ६३ रुग्ण*
ग्रामीण भागात ६३ रुग्ण आढळून आले. रांजणगाव ७, छत्रपती नगर, रांजणगाव १, श्रीगणेश वसाहत, वाळूज १, स्वामी केशवानंद नगर, रांजणगाव ३, दत्त नगर, रांजणगाव १, विटावा, गंगापूर ६, अजिंक्यतारा सोसायटी जिकठाण १, साठे नगर, वाळूज १, जुने रांजणगाव १, रांजणगाव शेणुपजी २, विजय नगर, वाळूज २, संघर्ष नगर, घाणेगाव १, म्हस्की चौफुली, वैजापूर १, कुंभारगल्ली, वैजापूर ३, बजाज नगर २, अजिंठा, सिल्लोड १, पळशी १, साऊथ सिटी १, समर्थ नगर, कन्नड २, विराज सोसायटी बजाजनगर १, मनोमय रेसिडन्सी, सिडको महानगर १, जय भवानी चौक, बजाजनगर १, जय भवानी नगर, बजाजनगर १, सिडको महानगर दोन १, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाजनगर २, निलकमल सोसायटी बजाजनगर १, तिसगाव ७, पारिजात नगर, बजाजनगर १, द्वारकानगरी, बजाजनगर ३, श्रमसाफल्य सोसायटी बजाजनगर ५, मयूरनगर, बजाजनगर, वडगाव १ या भागातील कोरोनाबाधित आहेत.
*चार कोरोनाबाधितांचा मृत्यू*
घाटीत पदमपुऱ्यातील ४२ वर्षीय पुरूष, आंबेडकर नगरातील ४९ वर्षीय स्त्री, औरंगपुऱ्यातील ६५ वर्षीय पुरूष, राम नगरातील ६५ वर्षीय पुरूष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.