कोव्हीड प्रशिक्षण केंद्रातच कोरोना!

Foto
डॉक्टर-कर्मचारी भयभीत
संपूर्ण मराठवाड्यातील डॉक्टरांना कोव्हीडचे प्रशिक्षण देणार्‍या सिडकोतील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रातील कर्मचार्‍याला  कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या केंद्रात काम करणार्‍या जवळपास 30 कर्मचारी आणि वास्तव्यास असलेल्या 20 डॉक्टर व परिचारिका यांनाही धोका निर्माण झाला असून कोरोना साखळीचा शोध घेण्यासाठी हे मोठे आव्हान आता प्राचार्यांसमोर आहे.
सिडकोतील आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्रातील एका  कर्मचार्‍याचा कोरोना अहवाल काल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. या प्रशिक्षण केंद्रात जवळपास तीस वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी काम करतात. तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांच्या आरोग्य अधिकारी तसेच कर्मचार्‍यांना येथूनच कोरोनाचे प्रशिक्षणही दिल्या जाते. दरम्यान काल शुक्रवारी केंद्रातील एका कर्मचार्‍याचा कोरूना अहवाल पॉझिटिव्ह आला. सदर कर्मचार्याच्या मुलाला सर्दी- ताप आल्याने कुटुंबातील सर्वांची चाचणीत सदर कर्मचारीही पॉझिटिव्ह निघाल्याचे बोलले जाते. आता साखळी मुलापर्यंत कशी पोहोचली ? याचा शोध घेण्याचे आव्हान प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यांवर आहे.
नशीब बलवत्तर म्हणून...
विशेष म्हणजे गेल्या 29 जुलैपासून मराठवाड्यातील 20 वैद्यकीय अधिकार्‍यांचे कोव्हीड प्रशिक्षण या केंद्रात आयोजित केले होते. प्राचार्य सुधाकर शेळके यांनी संबंधितांना आदेशही पाठवले होते. मात्र औरंगाबाद हॉटस्पॉट असल्याने इतर जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी प्रशिक्षणाला येण्याचे टाळले. औरंगाबाद शहरातील दोन तर जालना जिल्ह्यातील दोन वैद्यकीय अधिकारी प्रशिक्षणाला उपस्थित झाले. गनपूर्ती अभावी प्रशिक्षण रद्द करण्यात आले.
साखळी शोधण्याचे आव्हान!
या प्रशिक्षण केंद्रात जवळपास तीस डॉक्टर्स आणि कर्मचारी नियमित उपस्थित असतात. पॉझिटिव्ह कर्मचारीही सलग कामावर हजर होते. त्यामुळे सर्वच कर्मचार्‍यांशी त्यांचा संपर्क आल्याचे समजते. दुसरीकडे इतरही काही कार्यालयांमध्ये कामानिमित्त हा कर्मचारी गेला होता. ती संपर्क साखळी आता शोधावी लागणार असल्याचे बोलले जाते