माजी महापौरांना कोरोना

Foto
औरंगाबादचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांना कोरोनाची लागन झाली असल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील सिग्मा हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.3 दिवसांपूर्वी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत शहरात आले होते. त्यावेळी घोडेलेंच्या संपर्कात आलेले सामंत व शिवसेनेचे इतर उपस्थित नेते ’ क्वारन्टाईन ’ होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.  3 दिवसांपूर्वी 19 तारखेला बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात परिक्षांसंदर्भात आढावा घेण्यासाठी उदय सामंत औरंगाबादेत आले होते.
त्यावेळी नंदकुमार घोडेले यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले होते. तसेच त्याचदिवशी त्यांनी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांची देखील सदिच्छा भेट घेतली होती. 
तसेच युवतीसेनेच्या व इतर सार्वजनिक कार्यक्रमात देखील त्यांनी सहभाग नोंदवला होता.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker