जिल्ह्यात कोरोनाचा कहर: कोरोनाचे आज ९९ रुग्ण वाढले

Foto
जिल्ह्यात कोरोनाचा कहर संपता संपेना. आज सकाळी जाहीर केलेल्या अहवालानुसार ९९ रुग्णांची नव्याने वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधीतांची संख्या ही ११७६५ वर जाऊन पोहचली आहे. यामुळे चिंता आणखी वाढली आहे. 

आज आलेल्या पहिल्या टप्प्यात आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील आतापर्यंत एकूण कोरोनाच्या रुग्णांची संख्या ११७६५ झाली आहे. त्यापैकी ६४९७ जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत ४०८ जणांचा मृत्यू झाला. तर सध्या ४८६० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 
शहरात ५६ रुग्ण वाढले
शहरात आज सकाळी ५६ रुग्ण वाढले आहेत. त्यात जवाहरकॉलनी ४, साईनगर, सातारा परिसर १, मोतीवालानगर १, एमजीएम हॉस्टेल परिसर १, टाऊनसेंटर १, एनसहा संभाजी कॉलनी ३, इंदिरानगर, गारखेडा १, एनसात १, म्हाडा कॉलनी, पीरबाजार १, बिस्म‍िल्ला कॉलनी ५, स्वामी विवेकानंदनगर १, क्रांतीनगर २, बन्सीलालनगर २, न्यू नंदनवन कॉलनी १, छावणी १, पदमपुरा १, तथागतनगर १, रामनगर १, इंदिरानगर, गारखेडा ४, आंबेडकरनगर ३, ब्रिजवाडी २, शिवाजीनगर ६, कासलवाल तारांगण परिसर,पडेगाव १, शिवाजीनगर,गारखेडा १, जवाहर कॉलनी १, नारेगाव २, पन्नालालनगर १, रोशनगेट १, अल्तमश कॉलनी, सेंट्रलनाका १, हर्सुल १, भक्तीनगर, पिसादेवी रोड १, गारखेडा १, चिकलठाणा १ या भागात रुग्ण आढळून आले आहेत.
ग्रामीण भागात ३६ रुग्ण वाढले
ग्रामीण भागातील औरंगाबाद १३, पैठण ५, हनुमाननगर, रांजणगाव १, चिंचोली लिंबाजी, कन्नड १, साकळी बु. -१, सूर्यवंशीनगर, बजाजनगर १, श्रीरामनगर, बजाजनगर २, वडगाव कोल्हाटी १, खतखेडा, कन्नड १, रांजणगाव, गंगापूर १, महेबुबखेडा ३, पंचशीलनगर, वैजापूर ५, जीवनगंगा,वैजापूर १ या भागात एकूण ३६ रुग्ण आढळून आले आहेत. 
सिटी एंट्री पॉइंटवर ७ रुग्ण
सिटी एंट्री पॉइंटवर रांजणगाव ५, सिडको महानगर २ असे एकूण ७ रुग्ण वाढले. 
आणखी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू
कोरोनामुळे आणखी एका कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील एका खासगी रुग्णालयात कन्नड तालुक्यातील टिळक नगरातील ७८ वर्षीय पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.