नगरसेवक मतीन पटेल प्रशासनाच्या रडारवर

Foto
बुलडोझर सज्ज ! मतीनच्या तिन्ही मालमत्ता अनधिकृत असल्याचा ठपका
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): सक्तीच्या धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा एजाज खान हिला आसरा दिल्याने मनपाने एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांना नोटीस बजावली आहे. त्यांचे घर, कार्यालय आणि ज्या घरात निदा खान यांना ठेवण्यात आले होते ती वास्तू अशा तिन्हीही मालमत्ता अनधिकृत असून त्यावर कारवाई करण्याचा उल्लेख नोटीसमध्ये करण्यात आला आहे. तीन दिवसात नोटीसचे उत्तर न दिल्यास मालमत्ता पाडण्याची कारवाई महापालिका प्रशासन करेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
निदा खान हिला एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी नारेगाव येथील कौसर पार्क येथील घरात आश्रय दिल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी त्यांना सहआरोपी करुन गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचा तपास सुरु असतानाच महापालिकेनेदेखील कारवाईचा बडगा उगारला आहे. मतीन पटेल यांचे घर, कार्यालय आणि निद खान यांना ज्या घरात आश्रय देण्यात आला होता त्या घरावर पालिकेने शनिवारी (दि.९)
ओवेसींच्या स्वागत बॅनरवर मतीनचा फोटो
एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या दौऱ्यात शहरभर स्वागताचे बॅनर आणि पोस्टर झळकले आहेत. या बॅनरवर एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांचा फोटो झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कॉर्पो रेट जिहाद प्रकरणी चौकशीच्या भोवऱ्यात असलेल्या पटेल यांचे फोटो सार्वजनिक फलकांवर झळकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नोटीस चिटकवली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाचे नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे म्हणाले की, पटेल यांच्या नारेगाव, कौसर पार्क येथील त्या तिन्हीही मालमत्ता अनधिकृत आहेत असे स्पष्ट झाले आहे, त्यामुळे शनिवारी या
मालमत्तांवर नोटीस चिटकवण्यात आली आहे. या मालमत्तांबद्दल तीन दिवसात खुलासा करा असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. लेखी खुलासा प्राप्त न झाल्यास हे प्रकरण एकतर्फी निकाली काढण्यात येईल.