सीसीआय केंद्र सुरू करण्यासाठी शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन
सिल्लोड, (प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या कापसाला शासकीय हमीभाव मिळावा आणि सिल्लोड तालुका जिनिंग प्रेसिंग येथे तातडीने कापूस खरेदी केंद्र सुरून सीसीआयच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावीत, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने आज सिल्लोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कापसाला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सीसीआयच्या अडमुठी धोरण व भ्रष्ट अधिकाऱ्यां विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत खरेदी केंद्र सुरू होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा देण्यात आला. दलाल हटवा, शेतकरी वाचवा. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा शेतकऱ्यांचा माल हमीभावाने खरेदी करा अशा घोषणा आंदोलनात देण्यात आल्या. आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगर, जळगाव महामार्गावर दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलनात आणलेला कापूस जाळून निषेध व्यक्त केला. मागण्या मान्य न झाल्यास शेतकऱ्यांच्या हितासाठी हा लढा अधिक तीव्र केला जाईल असे आंदोलकांनी सांगितले.
या आंदोलनात माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार देखील उपस्थित होते. विधानसभेत तारांकित प्रश्नाचे उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी सिल्लोड ला सीसीआय केंद्र सुरू करण्याचे सांगितले त्यानंतर देखील सीसीआय केंद्र सुरू न झाल्याने सीसीआयच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी करण्यात यावी तसेच सिल्लोड येथील तालुका सहकारी जिनिंग मध्ये हमीभावाने कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी आमदार अब्दुल सत्तार यांनी केली. सदरील मागणी
तातडीने मान्य न झाल्यास याहून अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आमदार अब्दुल सत्तार यांनी दिला.
शेतकऱ्यांच्या हितासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेचा कायम पुढाकार राहिला आहे असे स्पष्ट करीत शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा ही आमची मागणी आहे. पीकविमा बाबत सकारात्मक विचार व्हायला हवा नसता त्यासाठी आंदोलन उभारले जाईल असा
उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी स्वीकारले निवेदन यावेळी उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी आंदोलनस्थळी भेट देवून निवेदन स्वीकारले. आंदोलकांच्या मागण्या शासनाकडे पाठवून याबाबत पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
तहसीलदार आंदोलनात नवनिर्वाचित नगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पा. तायडे, कृउबा समितीचे सभापती विश्वास गाढे, उपसभापती संदीप राऊत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, देविदास लोखंडे, जिल्हा संघटक सुदर्शन अग्रवाल, शहरप्रमुख मनोज झंवर, माजी उपनगराध्यक्ष विनोद मंडलेचा, महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, कृउबा समितीचे संचालक नंदकिशोर सहारे, दामूअण्णा गव्हाणे, जयराम चिंचपुरे, नानासाहेब रहाटे, शेख जावेद, प्रताप प्रसाद, देविदास पालोदकर, तालुका सहकारी जीनिंगचे चेअरमन गणेश गरुड, व्हाईस चेअरमन अनिस पठाण, रमेश साळवे, संजय डमाळे राजूबाबा काळे, राजेंद्र ठोंबरे, सयाजीराव वाघ, अक्षय मगर, विठ्ठल सपकाळ, शेख सलीम, रउफ बागवान, हनिफ मुलतानी, शंकरराव खांडवे, शेख इम्रान, सुनील दुधे, अकिल वसईकर, सुधाकर गायकवाड, दीपक सोनवणे, डॉ. फेरोज खान, सत्तार हुसेन, अशोक कांबळे, अक्रम देशमुख, प्रमोद शिंदे, सुधाकर पाटील, संदीप मानकर, फहिम पठाण आदींसह तालुक्यातील शेतकरी, शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
इशारा आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिला.















