कमी अंतरावर हवी कापूस लागवड : कापूस वाडगाव येथे प्रशिक्षण

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील कापूस वडगाव येथे तालुका कृषी विभाग यांच्यामार्फत कापूस उत्पादक अभियान कापूस क्रांती योजनेअंतर्गत शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले. या वेळी तालुका कृषी अधिकारी व्यंकट टक्के यांनी कमी अंतरावर व अती घन लागवड अंतरावर ज्या शेतकऱ्यांची गटामार्फत निवड झाली त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून लागवड करावी. वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने मेहनत घ्यावी, असे आवाहन केले.

त्यानंतर एनआपीचे शास्त्रज्ञ आणि सहयोगी संचालक डॉ. सूर्यकांत पवार यांनी शेतकऱ्यांना पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्याने लागवड करू नये. जमिनीच्या प्रकारानुसार वाणाची निवड करून लागवड वैजापूर तालुक्यातील कापुसवाडगाव येथे कृषी विभागातर्फे शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले.

करावी, लागवड करण्यापूर्वी जैविक खताची बीज प्रक्रिया करावी व विद्यापीठाने शिफारस केले. यानुसार खताची मात्रा द्यावी; तसेच वेगवेगळ्या पिकांच्या अवस्थेमध्ये पिकांना काय द्यावे, याबद्दल मार्गदर्शन केले. या वर्षी एल निनोचा प्रभाव असल्यामुळे पाऊस कमी पडण्याची शक्यता असल्याने सर्वांनी बीबीएफचा किंवा बेडवर लागवड करावी, असा महत्त्वाचा सल्ला डॉ पवार यांनी शेतकऱ्यांना दिला.

या वर्षी वैजापूर तालुक्यांमध्ये कापूस उत्पादक अभियान कापूस क्रांती योजनेअंतर्गत कमी अंतरावर लागवड करण्यासाठी ५०० हेक्टर, अति घन लागवड करण्यासाठी ६१० हेक्टर व आंतरपीक पद्धतीसाठी ७० हेक्टर लक्षांक प्राप्त झाले आहेत. यासाठी तालुक्यातील विविध गटामार्फत ऑनलाइन नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना या बियाण्यांचे वाटप करण्यात येत आहे. मंडळ कृषी अधिकारी माधव गांगुर्डे यांनी महाविस्तार आणि डीबीटी योजनांची माहिती दिली.

 तसेच नूजुविड कंपनीचे प्रतिनिधी दांडगे यांनी मार्गदर्शन केले. सहायक कृषी अधिकारी मीना पंडित यांनी आभार मानले. शेतकरी मंगेश रोहम, नानासाहेब कदम, नानाभाऊ थोरात, दत्तात्रय धामणे, सुभाष आंबेकर, दादा गवळी, राहुल थोरात, गणपत थोरात आदींची या वेळी उपस्थिती होती.