बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार

Foto
वैजापूर-श्रीरापूर रोडवरील खंबाळा फाटा येथे आज पहाटेच्या सुमारास बिबट्याने एका गायीवर हल्‍ला करून तिला ठार मारले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती वन विभागाला कळविण्यात आली असून वन कर्मचारी बिबट्याच्या पाऊलखुणा पाहत शोध घेत आहेत. 
गुरुवारी (दि. 30) पहाटे 5 वाजेच्या सुमारास बिबट्याने गायवर हल्ला करुन गंभीर जखमी करुन ठार केले
खंबाळा शिवार गट नंबर 77 मध्यें शेतवस्तीवर राहणारे सुरज राजपूत यांची गाय बिबट्याने हल्लात गंभीर जखमी करुन जागेवर ठार झाले तसेच या परिसरात दाट लोकवस्ती आहे या घटनेमुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे ये पिंजरा बसविण्यात यावे येथील शेतकर्यांचे मागणी आहे तसेच परिसरात बिबट्याचे ठसे आढळून आले आहे यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले
 वनविभागाचे कर्मचारी चव्हाण व वैद्यकीय यांनी घटनास्थळी आले असून पंचनामा केला आहे