साजवार्ता
Date: 18/11/2026
मनपा आयुक्त अमोल येडगे यांचा इशारा : भूमाफियांचे धाबे दणाणले
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): शहरातील अवैध प्लॉटिंग आणि अनधिकृत बांधकामांचा आढावा घेताना आयुक्तांनी प्रत्येक सहाय्यक आयुक्त व इमारत निरीक्षकांनी आपापल्या प्रभागात सुरू असलेल्या अवैध प्लॉटिंग आणि अनधिकृत बांधकामांवर नियमित लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. अशी प्रकरणे निदर्शनास येताच संबंधितांना तातडीने नोटीस बजावून बांधकामाचे काम थांबविण्याची कारवाई करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
सर्व प्रकारच्या मालमत्तांवरील थकीत मालमत्ता कराची एकरकमी रक्कम भरल्यास शास्तीवर १०० टक्के सूट देण्याच्या योजनेचा नागरिकांमध्ये व्यापक प्रचार करून थकीत मालमत्ता कराची संपूर्ण
छत्रपती संभाजानगर महानगरापलिका
वसुली करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी आज दिले. महानगरपालिका मुख्यालयात सर्व सहाय्यक आयुक्त, इमारत निरीक्षक, नगररचना विभाग व अतिक्रमण विभागाची संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आयुक्त येडगे यांनी विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेत
महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
निर्माणाधीन इमारतींबाबत बोलताना आयुक्त म्हणाले की, ज्या इमारती नियमानुसार नियमित करता येणे शक्य आहे, त्यांना नियमानुसार नियमित करण्याची प्रक्रिया राबवावी. मात्र, ज्या इमारती नियमित करता येणार नाहीत, त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई
अनधिकृत होर्डिंगवर कारवाईचे निर्देश
शहरातील अनधिकृत होर्डिंग व फलकांविरुद्धची कारवाई अधिक तीव्र करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. प्रत्येक प्रभागात नियमितपणे अशी कारवाई सुरू असल्याची माहिती सहाय्यक आयुक्तांनी बैठकीत दिली. विशेषतः वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे तसेच प्रथमदर्शनी धोकादायक वाटणारे होर्डिंग तातडीने हटविण्याची कारवाई करावी, असे निर्देश आयुक्त अमोल येडगे यांनी दिले.
करण्यात येईल. शहरातील एकाही प्रभागात अवैध प्लॉटिंग किंवा अनधिकृत बांधकाम होणार नाही, याची दक्षता सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय, प्लॉटिंग किंवा निर्माणाधीन इमारतींसाठी परवानगी घेण्यात आली आहे की नाही, याची पडताळणी करण्यासाठी नगररचना विभागामार्फत बीपीएमएस प्रणालीचा
वापर करण्याबाबत पुढील आठवड्यात सहाय्यक आयुक्त व इमारत निरीक्षकांना प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. सदरील बैठकीत अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, सनियंत्रण अधिकारी अतिक्रमण विभाग संतोष वाहूळे, नगररचनाकार कौस्तुभ भावे, उपायुक्त अतिक्रमण सविता सोनवणे आदींची उपस्थिती होती.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions










