छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): १९९० च्या दशकात शहरात 'दबंग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका व्यक्तीच्या मिटमिटा येथील बंगल्यावर शहर गुन्हे शाखेने गुप्तपणे छापा टाकला. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीच्या निधनानंतर अवघ्या एका महिन्याने ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. शुक्रवारी पहाटे ४ वाजता सुरू झालेली ही कारवाई मध्यरात्री १ वाजेपर्यंत, म्हणजेच सुमारे २१ तास चालली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions
या कारवाईत कोटींच्या घरात रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने आणि काही शस्त्रे जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
सूत्रांच्या
माहितीनुसार,
'बाबा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या व्यक्तीचा १९९० च्या दशकात शहरात मोठा दबदबा होता. जमिनीचे व्यवहार आणि मोठ्या आर्थिक व्यवहारांमध्ये
» पाच नोटा मोजण्याची यंत्रे मागवली
गुन्हे शाखेने मिटमिटा येथील बंगल्यावर छापा टाकल्यानंतर पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली होती. मात्र, कारवाई दरम्यान बंगल्यामध्ये प्रचंड प्रमाणात रोकड सापडल्याने पोलिसांना पैशांची मोजदाद करण्यासाठी तब्बल पाचपेक्षा जास्त नोटा मोजण्याची यंत्रे मागवावी लागली होती. शुक्रवारी पहाटेपासून सुरू झालेली झाडाझडती थेट शनिवारी मध्यरात्रीपर्यंत सुरू असल्याने या कारवाईने संपूर्ण शहरात आणि विशेषतः भूमाफिया व राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची अधिकृत माहिती अद्याप पोलिसांकडून समोर आलेली नाही.
त्याचा मोठा प्रभाव असल्याचे सांगितले जाते. या व्यक्तीची सिटी
चौक आणि मिटमिता भागात दोन घरे आहेत.