शाळा परिसरात तंबाखू विकणाऱ्याविरुद्ध गुन्हा

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी) : शाळा परीसरात तंबाखू विकणाऱ्या एका जणांविरुद्ध पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हनुमंतगाव येथे पोलिसांनी ही कारवाई केली. निरंजन खैरनार असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून २५० रुपयांची तंबाखू जप्त करण्यात आली.

अंमलदार सागर शिंदे यांनी ही कारवाई केली. खैरनार विरूद्ध विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार जाधव हे करीत आहेत. फर्दापूर दि २१ (सा.वा) बचत गटांच्या कामातून काढून टाकू अशी धमकी देत विनयभंग केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बरखेडी तांडा वृ येथील एक महिला बचतगटांच्या सिआरपी ग्रामसखी म्हणून काम पाहतात, त्या आपल्या घरात काम करत असतांना पंचायत समिती सदस्य राहुल अंकुश राठोड (वय ३२) मनोज मदन राठोड (वय ३२) अमरसिंग राजमल राठोड (वय ३०) सर्व रा वरखेडी तांडा यांनी मंगळवारी साडेसात वाजता घरकाम करत असलेल्या महिलेच्या घरात शिरून शिवीगाळ करू लागले. 

तक्रारदार महिला यांचे पती बोलण्यासाठी गेले असता त्यांना हि मारहाण करून धमकी दिली. आणि तक्रारदार महिला यास तिघांनी मिळून विनयभंग केला आणि तुला बचत गटांच्या कामातून काढून टाकू अशी धमकी दिली.