पैठण, (प्रतिनिधी) आषाढी एकादशी निमीत्त पैठण येथीलनाथ संस्थानचे अध्यक्ष तथा आमदार विलास भुमरे यांनी सपत्नीक नाथ समाधीचे दर्शन घेऊन आरती केली. पहाटे चार वाजेपासूनच भाविकांनी दक्षिण काशी पवित्र गोदावरी नदीत गोदस्नान करून नाथ समाधीचे शांततेत दर्शन घेतले.
नाथ समधीचे दर्शन घेण्यासाठी जवळपास दोन किमीपर्यंत भविकांच्या रांगा लागल्या होत्या. ज्या वारकरी भाविकांना आषाढी एकादशी निमित्त पंढरपुर येथे विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी जाता आले नाही. ज्यांना विठ्ठलाच्या दर्शनाचे भाग्य लाभले नाही ते भावीक वारकरी पैठण येथे येऊन ज्या नाथांच्या घरी श्रीखंडेरायाच्या रुपात पांडुरंगाने १२ वर्षे पाणी भरले त्या नाथांच्या समाधीचे दर्शन घेउन समाधान व्यक्त करतात.
दरम्यान कोणतीही घटना घडू नये, म्हणून पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला. नाथ संस्थानच्या वतीने भाविकांना चोरापासून सावध रहावे, आपले दाग दागिने सांभाळावे, शिस्तीने दर्शन घ्यावे असे आवाहन करण्यात येत होते.












