एकाच दिवसात २८० फायली दाखल; मनपा तिजोरीत पावणेदोन कोटींची भर
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): महानगरपालिकेने गुंठेवारी भागातील भूखंड नियमितीकरणासाठी जाहीर केलेल्या ५० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. सवलत मंगळवारी (दि.१५) संपत असून, त्यानंतर केवळ २५ टक्के सूट मिळणार आहे.
शासकीय सुटी असूनही महापालिकेचा गुंठेवारी कक्ष शनिवारी (दि. १२) आणि
रविवार (दि.१३) असे दोन्ही दिवस सुरू ठेवण्यात आला. यादरम्यान शनिवारी मालमत्ताधारकांनी एकाच दिवसात २८० फायली महापालिकेकडे दाखल केल्या, ज्यामुळे एकाच दिवसात महापालिकेच्या तिजोरीत सुमारे १ कोटी ७५ लाख रुपयांची भर पडली आहे. गुंठेवारीला मुदतवाढ देताना शहरात नव्याने बेकायदा वसाहती वाढणार नाहीत, याची दक्षता घेत महापौरांनी कारवाईचे आदेश प्रशासनाला
दिले आहेत. त्यानुसार अतिक्रमण हटाव विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत सुमारे साडेचारशे एकरांवरील बेकायदा भूखंड निष्कासित केले आहेत.
गुंठेवारीची सुमारे ३६ हजारांवर प्रकरणे आहेत. आतापर्यंत सुमारे १२ हजारांवर नागरिकांनी गुंठेवारी करून घेतली आहे. शहरातील गुंठेवारीचा विषय कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी
ही शेवटची मुदत...
▶ गुंठेवारीचा विषय कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी महापालिकेने मालमत्ताधारकांना मोठी सूट जाहीर केली आहे. त्याचा फायदा घेऊन मालमत्ताधारकांनी भूखंड व घरे नियमित करून घ्यावीत. महापालिकेने दिलेली ही शेवटची मुदतवाढ आहे. समीर राजूरकर, महापौर
महापौर समीर राजूरकर यांनी भूखंडाच्या डेव्हलपमेंट चार्जेसमध्ये ५० टक्के सवलत
जाहीर केली, तर बांधकामासाठी मार्जिन'चा दंड पूर्णपणे रद्द केला.
https:llepaper.sanjwarta.in/Powered By Vrudhee Solutions














