पैठण, (प्रतिनिधी): राष्ट्रीयसंत भानुदास महाराज पैठणकर यांनी कर्नाटकातील विजयनगरचा राजा कृष्णदेवराया यांच्याकडून अनागोंदीच्या राज महलातून पांडुरंगाची मुर्ती पुन्हा पंढरपुरास शके १४२८ तथा इ. स. १५०६ ला कार्तिकी एकादशीस आणून प्राणप्रतिष्ठा केली.
या घटनेस यंदाच्या कार्तिकी एकादशीला ५२० वर्ष पुर्ण झाली. कार्तिकी एकादशीच्या शुभपर्वावर आज शनिवारी भल्या पहाटेपासून भाविकांनी दक्षिण काशीतील पैठण येथील गोदावरीत स्नान करून भक्तांनी दुष्काळाच्या झळा सोसत परंपरेनुसार एकनाथ महाराज पादुकांसाठी गर्दी केली होती. या वेळी मंदिरात सामाजिक संघटनेकडून भक्तांना उपवासाचे फराळ वाटप करण्यात आले. शहरातील मठ मंदीरातून प्रवचन, किर्तन तसेच जागरचे कार्यक्रम झाले.
चालीरीती प्रमाणे अनेक दिंड्या गावागावातुन पायपीट करीत महाराजांच्या दर्शनासाठी आल्या.
भागवत गल्लीतील वृंदावन भक्ती दालनात या सुरेश जोशी यांच्या निवासस्थानी गीतापारायण सप्ताहही
मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा केला जात आहे. यावेळी प्रवचनकार कै. वनमालाबाई देशमुख यांचा सामाजिक त्याग या विषयावर प्रा. सुरेश जोशी यांचे व्याख्यान झाले. यावेळी महिलांनी भजने म्हणुन कार्यक्रमात रंगत भरली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वामी गोपालनंद भारती, घनश्याम मुंगीकर, रमेशपाठक, दिनेश पारीख, प्रकाश नाईक, अशोक गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.














