पनीरमध्ये आढळली भेसळ मनीप्लॅट हॉटेलचा परवाना निलंबित

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): पनीरमध्ये वनस्पतीजन्य चरबीची भेसळ आढळल्याने वडगाव कोल्हाटी येथील मनीप्लॅट हॉटेलचा परवाना अन्न व औषध प्रशासन विभागाने निलंबित केला आहे.
एफडीएच्या अधिकाऱ्यांनी हॉटेलमधून घेतलेल्या पनीरच्या नमुन्याची प्रयोगशाळेत तपासणी केली असता, त्यामध्ये दुग्धजन्य स्निग्धांश विहित मानकापेक्षा अत्यंत कमी (४२. ७१ टक्के) आढळले. तसेच वनस्पतीजन्य स्निगधांशची (व्हेजिटेबल फॅट) गंभीर भेसळ असल्याचे सिद्ध झाल्याने अन्न विश्लेषकांनी हे पनीर असुरक्षित घोषित केले
आहे.
तपासणीदरम्यान हॉटेलमध्ये कीटक व उपद्रवाची चिन्हे, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, पाण्याच्या चाचणी अहवालाचा अभाव, आणि अन्न हाताळणाऱ्या वैद्यकीय तपासणीच्या कर्मचाऱ्यांच्या नोंदी नसणे अशा अनेक त्रुटी आढळून आल्या. प्रशासनाने या प्रकरणी बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसला हॉटेल चालकाने विहित मुदतीत कोणतेही लेखी स्पष्टीकरण किंवा सुधारात्मक अहवाल सादर केला नाही. सहायक आयुक्त (अन्न) द. वि. पाटील यांनी हॉटेलचा परवाना तत्काळ निलंबित केला.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions