पालोदकर महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनी सांस्कृतिक कार्यक्रम

Foto
सिल्लोड (प्रतिनिधी)
T: पालोद येथील सहकार व महर्षी माणिकराव पालोदकर - महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्ती पूर्ण वातावरणात सांस्कृतिक र कार्यक्रमासह साजरा करण्यात - आला.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर 5 काकडे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली तर राष्ट्रगीत गाऊन राष्ट्रीय ध्वजाला सलामी देण्यात आली. 5 शाळेच्या एन सी सी कॅडेट्सच्या - विद्यार्थ्यांनी सामूहिक कवायतीसह र संचलन सादर केले. याप्रसंगी मुलींच्या लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये देशभक्तीपर गीते, सांस्कृतिक नृत्य, नाटिका, भारुड सादर करून समाज प्रबोधन करण्यात आले. तसेच भारतीय वाद्यावरती समूह गायनातून विद्यार्थ्यांनी आपला कलागुण व आत्मविश्वास दाखवला. सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात आमच्या पप्पांन गणपती आणला. 

या बाल नृत्याने झाली. वेडी म्हणत्यात मला व दारुड्या मी या भारुडाने उपस्थितांची मने जिंकली. यासोबत अशी पंढरी पंढरी ग, जन्म बाईचा बाईचा, झुलवा पाळणा पाळणा बाल शिवाजीचा, आमचे दैवत छत्रपती, बुमरो बुमरो शाम रंग बुमरो, पापा मेरे पापा, उदे ग अंबे उदे अशा
विविध गाण्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उत्स्फूर्त व सृजनशील सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. दरम्यान विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षक, पालक व नागरिकांकडून पैशाच्या स्वरूपात बक्षीस दिली गेली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे शिक्षक दिलीप जाधव, प्रदीप कानडजे, कृष्णा भांडारे, सुनील तांबे, राजेश ठोंबरे, कृष्णा पाटील, सुनील सागरे, भास्कर केरले, जयश्री चापे, महादेवी ठवरे, योगेश निंभोरे, एकनाथ जंजाळ, प्रफुल कळम, डॉ. रमेश काळे, संतुकराव मोरे, अक्षय निकम यांनी परिश्रम घेतले.