शुक्रवार पासून शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.त्यामुळे मागील तीन दिवसापासून शहरातील चौकाचौकात पोलिसांची नाकाबंदी सुरू आहे. दुचाकी वरून गल्लोगल्ली पेट्रोलिग सुरू आहे.तर पोलिसांच्या मदतीला राज्य राखीव दलाच्या तुकड्या, मनपा कर्मचारी आहे.घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येकाला पोलिसांकडून चौकशी केल्यानंतरच सोडले जाते असे चित्र औरंगाबाद शहरात ठीक-ठिकाणी दिवसा पाहायला मिळत आहे. एवढे कडेकोट बंदोबस्त असताना देखील संचारबंदीच्या काळात शुक्रवारी वडगाव कोल्हाटीत खून करण्यात आला तर शनिवारी पहाटे संजयनगर मध्ये भाजी विक्रेत्यांची दुचाकी जाळण्यात आली तर मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास सिडकोतील एन-3 मध्ये दुकानाचे शटर उचकटण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे दिवसा जरी सर्वसंन्यासाठी संचारबंदी असली तरी रात्र ही चोरट्यांची असल्याचे दिसते त्यामुळे शहरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.













