पैठण (प्रतिनिधी): हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय दादेगाव बु. ता. पैठण येथे उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच या वेळी शिवरायांना अभिवादन केले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम, दूरदृष्टी, लोककल्याणकारी शासनव्यवस्था आणि स्वराज्य स्थापनेतील ऐतिहासिक योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. शिवरायांनी दिलेला स्वाभिमान, न्याय, समता आणि राष्ट्रभक्तीचा संदेश आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. तसेच शिवरायांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमास पैठण शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाचे संचालक अनिल हजारे, मुख्याध्यापक जगन्नाथ कारके, उद्धव हजारे, परसराम हजारे, शाळा समिती अध्यक्ष अरुण हजारे, भाजपाचे भरत थोटे, नारायण हजारे, शिवनाथ हजारे, नामदेव भुकेले, संपत झिने, अप्पासाहेब हजारे, अशोक भुकेले, सोपान हजारे, अरुण भुकेले, काकासाहेब सातपुते, सुदर्शन हजारे, नरहरी हजारे, रविंद्र हजारे, विष्णू हजारे, भाऊसाहेब हजारे, संभाजी हजारे, राधाकिसन सातपुते, दिलीपराव बोडखे, पवन गोरे, दिलीप झिने, मोहनराव माळी, ज्ञानदेव हजारे, बाळूकाका हजारे, राम हजारे, सचिन झिने, किरण वाहूळे, किरण झिने, बाबासाहेब वाहूळे, अजिंक्य झिने यांच्यासह शिक्षक, ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













