दक्षिण काशी नाथनगरी दुमदुमली..!!

Foto
‘धन्य धन्य एकनाथा तुमचे चरणी माझा माथा`पैठण :  येथील दक्षिण काशीत श्री संत एकनाथ महाराजांचा ४२४ वा नाथ षष्ठी सोहळा साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर, जालना, धाराशिव , नांदेड, हिंगोली, अहमदनगर, सोलापूर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यासह आदी जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाच्या पाचशेच्यावर दिंड्या दिनांक १२ मार्च रविवारी फाल्गुन वद्य पंचमीच्या मध्यरात्रीपर्यंत दाखल झाल्या. पैठण नगरी भानुदास एकनाथाच्या गजराने दुमदुमून गेली आहे.


श्री संत एकनाथ महाराजांचा जलसमाधी सोहळा असल्यामुळे नाथ वंशजाच्या मानाच्या दिंड्यासह वारकऱ्यांच्या दिंड्यांनी गावातील नाथ मंदिर ते बाहेरील नाथ समाधी मंदिर दर्शन नगर प्रदर्शना केली. यावेळी वारकऱ्यांनी धन्य धन्य एकनाथा  तुमचे चरणी माझा नाम माथा ङ्गङ्घअसा गजर भक्तिमय वातावरणात केला. 

त्या प्रसंगी अवघेची त्रिलोक्य आनंदाची आता। 
चरणी जगन्नाथा  चित्त ठेलल॥ 
माय जगन्नाथ, बापा जगन्नाथ। 
अनाथांचा नाथ जनार्दन॥
 एका जनार्दनी एक पणे उभा।
 चैतन्याची शोभा शोभतसे ॥ 
या अभंगावर नाथांनी किर्तन केले होते. त्याच अभंगावर बहुसंख्य महाराजांनी  परंपरेनुसार कीर्तन करून नाथांचा पुण्यतिथी सोहळा साजरा केला.
फाल्गुन वद्य नाथषष्ठीचे वैशिष्ट्य, नाथांचे गुरु, जनार्दन स्वामींचा जन्म, नाथांची जनार्दन स्वामीची पहिली देवगिरीवर भेट, नाथांना जनार्दन स्वामींनी दत्तात्रय दर्शन घडविले. नाथांना सुलीभंजन वर भगवान श्रीकृष्णाचे दर्शन झाले. नाथांचे गुरु जनार्दन स्वामींनी देह ठेवला. नाथांनी पैठणच्या गोदावरीत जलसमाधी घेतली. 


केले स्वागत 
नाथषष्ठीचा सोहळा साजरा करण्यासाठी पालकमंत्री संदिपान भुमरे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर व जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांड्या यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाचे विविध खात्याचे अधिकारी यात्रा यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.
 पैठण शहरात दाखल होणाऱ्या दिंड्यांचे प्रशासनाच्या वतीने उप - विभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल, तहसीलदार शंकर लाड, मुख्याधिकारी संतोष आगळे, पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, अश्‍विन गोजरे आदींनी स्वागत केले.


Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker