छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): वर्हाडी मंडळी आली. मंडपात नवरदेवही आला. सर्व तयारी झाली. मात्र मुलीचे वय कमी असल्याची माहिती दामिनी पथकाला कळली. आणि थेट मंडपात धाड टाकत दामिनी पथकाने बालविवाह थांबविला. कारण पाहिले तर मुलीची आई भांडी, धुण्याचे काम करते, दिनमान चांगले नाही, परिस्थितीही नाजूक असल्याची कारणे समोर आले. त्यावर दामिनी पथकाने त्यांना समज दिली.
लग्नसमारंभात स्वयंपाक देखील झाला होता. स्टेज लावलेले होते स्टेजला नवरदेव नवरीचे नावाची नेमप्लेट लावलेली होती. तसेच आहेराची भांडीकुंडी संसार लावून ठेवलेली होती. सदर बालविवाह थांबविण्यात आला. महिला बालविकास समितीच्या सदस्य आम्रपाली बोर्डे यांनी पोलीस उपनिरीक्षक कांचन मिरधे यांना फोनद्वारे सांगितले की, बीड बायपास रोड येथे साडेबारा वाजता होणार आहेत.
त्यावरून सदर ठिकाणी पोलिस उपनिरीक्षक कांचन मिरधे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल निर्मला निंभोरे, कविता गवळी, मोनिका दिवे, सुनिता नागलोद, महिला बालविकासच्या सदस्य आम्रपाली बोर्डे सातारा पोलीस स्टेशनचे बीट मार्शलचे कर्मचारी पोलीस अंमलदार सचिन चव्हाण या टीमने बालविवाह थांबविला.











