वक्फ बोर्डाच्या सीईओंची दर्गा कमिटीच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

Foto
खुलताबाद, (प्रतिनिधी): महाराष्ट्र अधिकारी फयाज खान यांची खुलताबाद येथील दर्गा कमिटी वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी हद्दे कला यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी भेट घेतली. 

यावेळी नुकत्याच झालेल्या हजरत मुंतजबोद्दीन जर जरी जर बक्ष दूल्हा (रह.) यांच्या उरूसासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. 

वक्फ बोर्डाच्या सूचनेनुसार उर्स कमिटीने ई-टेंडरिंग प्रक्रियां पूर्ण केल्याबद्दल खान यांनी समाधान व्यक्त केले. शिष्टमंडळात अध्यक्ष एजाज अहमद, सचिव मोहम्मद मतीन, माजी नगराध्यक्ष अॅड. कैसरोद्दीन व सदस्य मुबशिरोद्दीन अमीरोद्दीन यांचा समावेश होता.