गंगापुरात सासूच्या पाठोपाठ झाला सुनेचाही मृत्यू

Foto
पालकमंत्री सिरसाठ यांच्याकडून कुटुंबियांचे सांत्वन

गंगापूर, (प्रतिनिधी) : ज्येष्ठ नागरिक शुक्रवारी गंगुबाई कन्हैयालालजी मुंदडा (वय १०५) यांचे निधन झाले होते. मात्र, या दुःखातून कुटुंब सावरत नाही, तोच आणखी एक हृदयद्रावक प्रसंग घडला. गंगुबाई यांच्या सुनेने, गंगाबाई जगन्नाथ मुंदडा (वय ६२) यांनी आज सायंकाळी मानसिक तणावाखाली स्वतः चा प्राणत्याग केला. या घटनेने मुंदडा परिवारावर दुः खाचा डोंगर कोसळला आहे.

स्व. गंगाबाई या महेश व रुपेश मुंदडा यांच्या मातोश्री होत, तसेच रामेश्वर मुंदडा यांच्या मोठ्या भाऊजई व गोपाल, सचिन, सुमीत, अमित मुंदडा यांच्या चुलती होत. त्यांच्या पश्चात भाऊ, जाऊ, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे व मोठा आप्त परिवार असा परिवार आहे. शहरातील प्रसिद्ध व्यापारी व गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रामेश्वर मुंदडा यांच्या परिवारावर एका दिवसात दोन दुःखद घटना ओढावल्या आहेत. त्यांची आई गंगुबाई मुंदडा व भाऊजाई गंगाबाई मुंदडा यांचे एका दिवसाच्या फरकाने निधन झाले. या घटनेने संपूर्ण गंगापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

--शुक्रवारी दोघांचे अंत्यसंस्कार ---

गंगुबाई व गंगाबाई मुंदडा यांच्या पार्थिवावर शुक्रवारी गंगापूरात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुःखद प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.

--शिवसेना मेळाव्यानंतर मान्यवरांची भेट ---

गंगापूरात पार पडलेल्या शिवसेना (शिंदे गट) मेळाव्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदिपान भुमरे, माजी आमदार कैलास पाटील, आणि माजी आमदार अण्णासाहेब माने, विकास जैन, शिवसेनेचे युवा नेते संतोष माने, तालुकाप्रमुख दिलीप निरपळ, सचिन काकडे, यांनी रामेश्वर मुंदडा यांच्या निवासस्थानी जाऊन भेट दिली.