नाथसागरात सापडला बीडच्या व्यक्तीचा मृतदेह; खून की आत्महत्या पोलिसांसमोर प्रश्न

Foto

पैठण -  येथील नाथसागर जलाशयात शनिवारी (ता. ८) सकाळी एक मृतदेह तरंगत असल्याचे काही महिलांनी पाहिले. बेवारस मृतदेहाची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला असून त्याच्या खिशात सापडलेल्या कागदपत्रांवरुन मृत व्यक्तीचे नाव आनंद मुंडे असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला कोणी मारुन नाथसागरात टाकले की त्याने आत्महत्या केली याचा तपास पोलिस करत आहेत.

दोन दिवसांपासून बीडमधून बेपत्ता

नाथसागर जलाशयातील साखळी क्रमांक १०६ येथे पाण्यावर एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती शनिवारी सकाळी पोलिसांना देण्यात आली. पोलिस निरीक्षक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहाणी केली. तोपर्यंत मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. पोलिसांनी मृतदेहाच्या खिशाची झडती घेतली असता त्यात आढळून आलेल्या कागदपत्रांवरुन मृत व्यक्तीचे नाव आनंद नामदेव मुंडे असल्याचे समोर आले आहे. तो बीड येथील रहिवासी आहे. बीड येथे संपर्क केला असता आनंद मुंडे तीन-चार दिवसांपासून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास पोलिस करत आहेत. 

(प्रतिकात्मक छायाचित्र)