घाटी रुग्णालयात आणखी दोन रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेले आहेत. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील मृत्यू होण्याची संख्या ही ३५६ वर जाऊन पोहचली आहे.
घाटी रुग्णालयात सिडको एन-६ येथील ४९ वर्षीय पुरुष रुग्णाचा १२ जुलै रोजी रात्री ८ वाजता मृत्यू झाला. तर छावणी भागातील मिलींद कॉलेज जवळ राहणाऱ्या ७६ वर्षीय स्त्री रुग्णाचा रात्री ११ वाजता मृत्यू झाल्याचे घाटी प्रशासनाच्या वतीने आज जाहीर करण्यात आले. सिडको एन-६ येथील रुग्णाला उपचारासाठी २ जुलै रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्या रुग्णाचा स्वब टेस्ट तपासणीत अहवाल पॉझिटिव्ह आला. तर छावणी येथील रुग्णास २९ जून रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या रुग्णाच्या स्वब टेस्टचा अहवाल ३० तारखेला पॉझिटिव्ह आला होता. या दोन्ही रुग्णांचा कोव्हीड-१९ मुळे रात्री मृत्यू झाल्याने जिल्ह्यात आतापर्यंत २५६ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.











