पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Foto
कन्नड, (प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर - नाशिक महामार्गावरील देन्हळ फाट्यानजीक भरधाव पिकअपने स्कूटरला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात खिर्डी (ता. कन्नड) येथील गौतम हिरामण पवार (वय ३५) यांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. ३) दुपारी चारला घडली.

अपघातानंतर बालक घटनास्थळावरून पसार झाला. गौतम पवार हे वैयक्तिक मानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथून खिडी येथे आले होते. काम आटोपून ते मित्र सचिन ठुबे याच्यासह स्कूटरवरून (क्र. एमएच ५७गौतम पवार डी) परत निघले असता, समोरून येणाऱ्या पिकअपने (क्र. एमएच २० एटी २०४५) त्यांना धडक दिली. 

यात गंभीर जखमी झालेल्या गौतम पवार यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचा मित्र किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान, अपघातानंतर संतात अज्ञात व्यक्तींनी संबंधित पिकअप पेटवून देण्याचा प्रयत्न केला. 

माहिती मिळताच लासूर स्टेशन चौकीचे बीट जमादार बिघोत व सहकाऱ्यांनी धाव घेत आग आटोक्यात आणली. पवार यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील, एक भाऊ व तीन बहिणी असा परिवार आहे.