७४ हजारांवर शेतकऱ्यांना ५१८ कोटींची कर्जमुक्ती

Foto
बँकांकडून रक्कम थेट बँक खात्यात केली जमा

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७४ हजार ९४५ शेतकऱ्यांना तब्बल ५१८ कोटी ५० लाख रुपयांचा कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे. जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीयकृत बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या माध्यमातून ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात ७ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील ३५,५४० कर्जखात्यांमध्ये २३१ कोटी १६ लाख रुपये वर्ग करण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी, २४ रोजी दुसऱ्या टप्प्यात आणखी ३९,४०५ कर्जखात्यांना २८७कोटी ३४ लाख
शेतकन्यांच्या हितासाठी महाराष्ट्र शासनाची भक्कम पावले.

१८,६०७ खात्यांना (९०.२४ कोटी रु.) आणि दुसऱ्या टप्प्यात ९,२८६ खात्यांना (४३.८९ कोटी रु.) लाभ हस्तांतरित करण्यात आला. बँक खात्यांमध्ये थेट कर्जमुक्तीची रक्कम जमा झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असून, ऐन हंगामात मिळालेल्या या आर्थिक पाठबळामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

-- बँकनिहाय कर्जमाफी अशी -- 
राष्ट्रीयकृत बँका : राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून सर्वाधिक ४७,०५२ शेतकरी खात्यांना एकूण ३८४.३७ कोटी रुपयांचा लाभझाला आहे. यात ७ ऑगस्टपर्यंत १६,९३३ खात्यांना (१४०.९२ कोटी रु.) आणि २४ ऑगस्टपर्यंत ३०, ११९ खात्यांना (२४३.४५ कोटी रु.) निधी मिळाला.

रुपयांचा लाभ देण्यात आला. अशा प्रकारे दोन्ही टप्प्यांत मिळून जिल्ह्यातील एकूण ७४,९४५ कर्जखात्यांना ५१८ कोटी ५० लाख रुपयांची मदत पोहोचली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २७,८९३ खात्यांना १३४. १३ कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळाली आहे.