मनसे रस्ते वाहतूक सुविधा विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : राज्यात आणि विशेषतः जिल्ह्यामध्ये गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे हाताशी आलेली पिके करपून गेली असून, पिण्याच्या पाण्याची आणि चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. अनेक तालुके व महसूल मंडळात भीषण परिस्थिती असताना
दुष्काळ जाहीर करावा, असे निवेदन मनसे रस्ते वाहतूक साधन सुविधा विभागाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील सर्व तालुके व महसूल मंडळात तात्काळ पूर्ण दुष्काळ जाहीर करण्यात यावा. बाधित शेतकऱ्यांना कोणत्याही जाचक अटी
निवासी
व शर्ती न लावता हेक्टरी भरीव आर्थिक मदत थेट खात्यावर जमा करण्यात यावी. चालू थकबाकीदार व थकबाकीदार भेद न करता सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी. सर्व बाधित शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई तात्काळ व विनाअट मंजूर करून तिचे वितरण करण्यात यावे, अशा
मागण्या निवेदनात करण्यात आल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रोज एका तालुक्यात तहसील कार्यालयावर घंटा बजाव, ढोल बजाव, डफड बजाव, हालगी बजाव व शिट्टी बजाव तसेच शंखनाद करून तीव्र आंदोलन करेल. शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे जिल्हा संघटक अशोक पवार पाटील निवेदनात म्हटले आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions















