दिल्ली पोलिसांचा मडिजिटल स्ट्राईकफ; सीजेपी आंदोलनातील १८० युट्यूबर्स, इन्फ्लुएन्सर्स रडारवर

Foto
दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या कॉकरोच जनता पार्टीचे  आंदोलन आणि मसंसद मोर्चाफ दरम्यान घडलेल्या घटनांनंतर आता दिल्लीपोलिसांच्या तपासाचा मुख्य फोकस सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळला आहे. पोलिसांनी या आंदोलनाशी संबंधित व्हिडीओ, पोस्ट, कमेंट्स, लाईव्ह स्ट्रीम आणि इतर डिजिटल कंटेंटची पाहणी सुरू केली आहे.
 
दिशाभूल करणारी माहिती, आक्षेपार्ह मजकूर किंवा हिंसेशी संबंधित निवडक व्हिडीओ प्रसारित करणार्‍या कंटेंन्टवर विशेष लक्ष केंद्रित केलं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांची नजर केवळ आंदोलनात प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या लोकांपर्यंतच मर्यादित नाही. आंदोलनादरम्यान किंवा त्यानंतर सातत्याने व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करणार्‍या युट्यूबर्स, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर्सच्या भूमिकेचीही सखोल चौकशी केली जात आहे.

युट्यूबर्सच्या भूमिकेची चौकशी
कोणत्या कंटेंट क्रिएटर्सनी घटनास्थळावरून व्हिडीओ तयार केले, त्यांनी कसले दावे केले आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अधिक तणावपूर्ण होईल असा कोणताही मनॅरेटिव्हफ (मजकूर/दृष्टिकोन) तयार करण्यासाठी व्हिडिओंमध्ये फेरफार (एवळींळपस) करण्यात आली होती का, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत.

एखाद्या व्हिडिओचं मूळ फुटेज काय होतं आणि सोशल मीडियावर व्हायरल होण्यापूर्वी त्यात कोणती एडिट, कटिंग किंवा ते संदर्भाबाहेर वापरले गेले होते का, हेदेखील पोलीस तपासत आहेत. उगझ च्या सुरुवातीच्या आंदोलनांमध्येही मोठ्या संख्येने युट्यूबर्स आणि इन्फ्लुएन्सर्सची उपस्थिती दिसून आली होती. सूत्रांनुसार, अनेक कंटेंट क्रिएटर्स आपल्या स्वतःच्या अजेंड्यासाठी आणि कंटेंटसाठी आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले होते.

१८० हून अधिक सोशल मीडिया हँडल्स 
आंदोलनाशी संबंधित सोशल मीडिया हालचालींचा आढावा घेत पोलिसांनी सुमारे १८० अतिरिक्त सोशल मीडिया हँडल्सचा तपास करत आहेत. यामध्ये अशा अकाऊंट्सचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे, ज्यांच्यावरून आंदोलनादरम्यान किंवा त्यानंतर अफवा पसरवणारी माहिती किंवा आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला गेला.

फेसबुक, इन्स्टाग्राम, द आणि युट्यूबला कंटेंट हटवण्याचे निर्देश
दिल्ली पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना आंदोलनाशी संबंधित बनावट, दिशाभूल करणार्‍या आणि आक्षेपार्ह पोस्ट तसेच व्हिडिओ हटवण्यासाठी नोटीस पाठवल्या आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आंदोलनादरम्यान आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात बनावट पोस्ट, छेडछाड केलेले व्हिडीओ आणि दिशाभूल करणारा मजकूर सोशल मीडियावर पसरवला गेला. पोलिसांनी फेसबुक, इन्स्टाग्राम, द (ट्विटर) आणि युट्यूबसारख्या प्लॅटफॉर्म्सना अशा कंटेंटवर कारवाई करण्यास सांगितले आहे.

या तपासात काही सोशल मीडिया आधारित न्यूज पोर्टल आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्म्सची भूमिकाही तपासली जात असल्याचं समोर आलं आहे. इन्फ्लुएन्सर्सनंतर तपासाची व्याप्ती आता सोशल मीडिया मॅनेजमेंट कंपन्यांपर्यंत पोहोचली आहे. काही सोशल मीडिया अकाऊंट्स संघटितपणे चालवले जात होते का, हा या तपासाचा एक महत्त्वाचा भाग आहे.