नामांतर शहीद स्मारकाचे काम बोगस कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी

Foto
: छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) डॉ.
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ऐतिहासिक नामांतर लढ्यातील शहीद हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या नामांतर शहीद स्मारकाचे काम संथ आणि दर्जाहीन सुरू असल्याचा आरोप महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.
या प्रकरणी संबंधित कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करून त्यांना तात्काळ काळ्या यादीत टाकावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा
इशारा पक्षाच्या वतीने प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनातून दिला आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, विद्यापीठाने या स्मारकासाठी निधी मंजूर करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे काम सुपूर्द केले होते. त्यानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रियंका रोहित नावंदर या एजन्सीला स्मारकाचे काम देण्यात आले. मात्र, गेल्या चार वर्षांपासून हे काम संथ गतीने सुरू आहे. संबंधित कंत्राटदाराच्या विशिष्ट मानसिकतेमुळेच या कामाची गती जाणीवपूर्वक रोखण्यात आली
असून, सद्यस्थिती पाहता हे काम बोगस आणि दर्जाहीन असल्याचा आरोप निवेदनात केला आहे.
या कामात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या संदर्भात पक्षाच्या वतीने यापूर्वीही अनेक तक्रारी, आंदोलने आणि उपोषणे करण्यात आली आहेत; मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल वडमारे यांची स्वाक्षरी आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions