रेल्वे कनेक्टिव्हिटी, मालवाहतूक सुविधांसाठी सीएमआयए आग्रही
NAIL BUSINESS LUNELLANG
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): मराठवाड्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी रेल्वे कनेक्टिव्हिटी, मालवाहतूक क्षमता आणि लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याची मागणी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर (सीएमआयए) च्या वतीने करण्यात आली. वरिष्ठ रेल्वे
अधिकाऱ्यांसोबत हैदराबाद येथे ९ ऑक्टोबर रोजी आयोजित उच्चस्तरीय चर्चे त सीएमआयएने उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा आणि प्राधान्यक्रम मांडले.
चर्चेला दक्षिण मध्य रेल्वेच्या प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक इती पांडे, दक्षिण किनारपट्टी रेल्वेचे प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक के. संबाशिव राव
तसेच रेल्वे बोर्ड, दक्षिण मध्य रेल्वे आणि विविध विभागीय रेल्वे कार्यालयांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यामध्ये वाणिज्य, परिचालन आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापनाशी संबंधित अधिकाऱ्यांचा समावेश होता. या चर्चेमध्ये सीएमआयएच्या वतीने अध्यक्ष अथर्वेशराज नंदावत यांनी रेल्वे विकासासाठी आग्रही भूमिका मांडली. ते म्हणाले, छत्रपती संभाजीनगर, ऑरिक सिटी, शेंद्रा, बिडकीन, वाळूज आणि जालना परिसरात औद्योगिक गुंतवणूक व उत्पादन क्षमता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कच्च्या मालाची आवक आणि तयार उत्पादनांची देशांतर्गत बाजारपेठा तसेच बंदरांकडे होणारी जावक यासाठी सक्षम रेल्वे नेटवर्क उभारणे आवश्यक आहे. रेल्वे मालवाहतुकीचा अधिक प्रभावी वापर झाल्यास उद्योगांचा वाहतूक खर्च
सीएमआयएच्या प्रमुख मागण्या
रेल्वे दुहेरीकरणाला हवी गती, छत्रपती संभाजीनगर परभणी आणि छत्रपती संभाजीनगर अंकाई रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पाला गती देण्याची मागणी करण्यात आली. या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील रेल्वे वाहतूक क्षमता वाढविण्यास आणि उत्तर-दक्षिण मालवाहतूक अधिक सक्षम करण्यास मदत होईल. तसेच ऑरिक सिटी शेंद्रा बिडकीन रेल्वे कनेक्टिव्हिटी वेगाने विकसित होत असलेल्या औद्योगिक पट्ट्यासाठी समर्पित रेल्वे मालवाहतूक पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर देण्यात आला. यामुळे औद्योगिक उत्पादनांची वाहतूक अधिक सुलभ आणि किफायतशीर होऊ शकेल, बिडकीन येथे समर्पित मालवाहतूक टर्मिनल बिडकीन औद्योगिक क्षेत्र आणि ऑरिक सिटीच्या गरजा लक्षात घेऊन समर्पित मालवाहतूक टर्मिनल विकसित करण्याची मागणी करण्यात आली. यामुळे कच्च्या मालाची आवक आणि तयार उत्पादनांची जावक कार्यक्षम पद्धतीने हाताळता येईल.
कमी होईल, पुरवठा साखळी सक्षम होईल आणि मराठवाड्यातील उद्योगांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्पर्धात्मकता वाढेल. त्यामुळे रेल्वे पायाभूत सुविधांचे
नियोजन औद्योगिक मागणी वाढल्यानंतर नव्हे, तर औद्योगिक विकासाच्या आधी किंवा त्याच्याबरोबर होणे गरजेचे असल्याचे सीएमआयएने अधोरेखित केले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions














