काही मिनिटांत १ टन कचरा गोळा करणाऱ्या 'जटायू'चे प्रात्याक्षिक

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरातील विविध ठिकाणी बनलेले कचरा डेपो कायमचे बंद करून त्या जागा महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने सुशोभित करण्यात येत आहेत. मात्र त्यानंतरही रात्रीच्या अंधारात, पहाटे किंवा सकाळच्या वेळी नागरिकांकडून कचरा आणून टाकला जात आहे. हा कचरा उचलण्यासाठी कर्मचारी, वाहने आणि लागणारा वेळ लक्षात घेता, अवघ्या काही मिनिटात मशीनद्वारे हा कचरा उचलण्याचे प्रात्याक्षिक एका कंपनीने नुकतेच शहरात केले. दहा मिनिटात सुमारे १ टन कचरा उचलून घेणाऱ्या या मशीनचे नाव 'जटायू' असे आहे. राजूरकर, नगरसेवक मनोज गांगवे, राजगौरव वानखेडे आदी उपस्थित होते. याबाबत महापौर त महापार राजूरकर म्हणाले की, कोणत्याही प्रकारच्या वाहनांवर हे मशीन बसविता येते. कमी मनुष्यबळ व कमी वेळेत सर्व कचरा उचलून घेते, असे या मशीनचे वैशिष्ट्य आहे. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांना याबाबत पुणे जिल्ह्यातून माहिती मिळाली होती.
चिकलठाणा एमआयडीसीत कंपनीने जटायू मशीनचा डेमो दाखविला. यावेळी महापौर समीर
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions