जलपूजन करून गोदा ते नर्मदा जलयात्रेचे प्रस्थान

Foto
कन्नड, (प्रतिनिधी): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त जलसंपदा विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या गोदा ते नर्मदा या राज्यव्यापी जलयात्रेत कन्नड तालुक्याने सहभाग नोंदविला. 

सोमवारी (दि.२०) तालुक्यातील शिवना नदीच्या पाण्याचे पूजन करून जलकलश अधिकृतपणे जलयात्रेत खाना करण्यात आला. आमदार संजना जाधव यांच्या हस्ते शिवना नदीच्या पाण्याचे विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी गोदावरी पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 

गोदावरी खोऱ्यातील सर्व नद्यांचे जलकलश शिडी येथे एकत्र करून ही मुख्य जलयात्रा २५ एप्रिलला शिर्डी येथून प्रस्थान करेल. छत्रपती संभाजीनगर- वेरूळ - कन्नड चाळीसगाव - धुळे या मार्गावरून ही यात्रा मध्य प्रदेशातील महेश्वर येथे पोचेल. तिथे नर्मदा नदीमध्ये जलकलशांचे विसर्जन केले जाणार असल्याची माहिती गोदावरी पाटबंधारे विभागाचे विभागोप अधिकारी शेख अशपाक यांनी दिली. यावेळी कार्यकारी अभियंता उमेश वानखेडे, शाखा अभियंता स्वादिल्ल चुंगडा, कनिष्ठ अभियंता बाबासाहेब दुसिंग, पं. स. सदस्य सिद्धेश्वर झाल्ये यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.