पैठण, पाचोड येथे वंचित बहुजन युवा आघाडीकडून कडकडीत बंद

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या आपल्या भविष्यासाठी चिंतीत असलेल्या विद्यार्थ्यांनी नीट पेपरफुटीला जबाबदार केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत संसदेकडे शांततापूर्ण मार्च काढला होता.

मात्र हुकूमशाही भाजप सरकारने अमानुष आणि क्रूर पद्धतीने विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याची घटना घडली आहे. विद्याथ्यावर केलेल्या लाठीचार्जच्या विरोधात आणि विद्यार्थ्यांच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी काल महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.

या हाकेला प्रतिसाद देत वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने पैठण व पाचोड कडकडीत बंद करण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्यास व विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही, तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पंकज गायकवाड युवक तालुकाध्यक्ष पैठण यांनी यावेळी दिला.

यावेळी उपस्थित राजू भुमरे सभापती मार्केट कमिटी ज्योतीराम वाव्हळ, आकाश मगरे, प्रकाश मगरे, राहुल शेळके, सर्कल अध्यक्ष विजय सरोदे, संतोष साबळे, सोमनाथ वाव्हळ, सुनिल वाव्हळ, अनिल वाव्हळ, जितेश वाव्हळ, प्रमोद हतागळे, राज म्हस्के, विशाल मोरे, सिद्धार्थ मगरे, उद्धव मगरे, ऋषी लोंढे, नितेश लोंढे, दीपक हतागळे, तुषार साबळे, योगेश सरोदे, आनंद मगरे, रणवीर वाव्हळ, निलेश वाव्हळ, अरुण लोंढे, योगेश वाव्हळ, किशोर वाव्हळ, प्रदीप साबळे, महादेव ठोके अमोल सुवर्णकार, प्रभाकर हातागळे, अरुण हातागळे, मंगेश हातागळे, कुणाल वाहुळे, कृष्णा मगरे, विकास मगरे, गणेश मगरे, रोहित मगरे यांच्यासह अनेक पक्ष संघटना व्यापारी सहभागी झाले होते.