गंगापूर, (प्रतिनिधी) : भूमि अभिलेख कार्यालयाच्या उप अधीक्षकपदी चंद्रकांत सेवक यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. यापूर्वी या पदावर कार्यरत असलेले सुभाष इपाळ यांची बदली बीड जिल्ह्यातील वडवणी येथे उप अधीक्षक भूमी अभिलेख वडवणी येथे करण्यात आली असून त्यांच्या जागी खुलताबाद येथून चंद्रकांत सेवक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सोमवारी सकाळी त्यांनी गंगापूर भूमि अभिलेख कार्यालयात पदभार स्वीकारल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत - केले. पदभार स्वीकारल्यानंतर कार्यालयीन कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक व नागरिकाभिमुख पद्धतीने करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रकांत सेवक यांना भूमि अभिलेख विभागातील कामाचा अनुभव असून त्यांच्या नियुक्तीमुळे गंगापूर तालुक्यातील नागरिकांच्या प्रलंबित कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यावेळी अप्पासाहेब एस. टॉपे, व्ही. एस. पुंड, परिरक्षण भूमापक सुषमा जाधव, एस. डी. हरणे, साधना लोखंडे, गोरख सावंत, शुभम अशोक वैष्णव, किशोर त्रिंबक डाके, दीपक एम. पल्हाळ, विजय गहेराव, अनुष्का बावस्कर, सिद्धी मनेश शेवाळे, श्रीकांत निंबोकार, संकेत यादव, विनोद दलाल, संजय निंबाजी नागरे त्यांच्या सत्कार करण्यात आला.