उपमहानिरीक्षक विजय भालेराव यांची गंगापूर दुय्यम निबंधक कार्यालयाला अचानक भेट

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी): दुय्यम निबंधक कार्यालयाचे अधिकारी अजित वीर यांच्या कामकाजाबाबत नागरिकांकडून वाढत्या तक्रारी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच उपमहानिरीक्षक विजय भालेराव यांनी कार्यालयाला अचानक भेट दिली. या भेटीनंतर संबंधित तक्रारींची चौकशी करून प्रत्यक्ष कारवाई होणार की प्रकरण केवळ कागदोपत्री राहणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

काही महिन्यांपासून दस्त नोंदणी, कामकाजातील विलंब, नागरिकांना मिळणारी वागणूक तसेच विविध प्रशासकीय बाबींविषयी अनेक तक्रारी वरिष्ठ कार्यालयाकडे पोहोचल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर उपमहानिरीक्षक विजय भालेराव यांनी अचानक भेट देत कार्यालयातील कामकाजाची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यांच्या या अचानक भेटीमुळे कार्यालयात एकच खळबळ उडाली. 

गेल्या काही दिवसांपासून दुय्यम निबंधक कार्यालयातील कामकाज, नागरिकांना होणारा विलंब तसेच विविध प्रशासकीय बाबींविषयी तक्रारींची संख्या वाढत असल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यावेळी उपमहानिरीक्षक विजय भालेराव यांनी कार्यालयातील विविध विभागांची पाहणी करत प्रलंबित प्रकरणे, नोंदणी प्रक्रिया तसेच प्राप्त झालेल्या तक्रारींशी संबंधित दस्तावेजांची तपासणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालयाचे अधिकारी अजित वीरच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.

 नागरिकांना वेळेत आणि पारदर्शक सेवा मिळणे आवश्यक असून, कामकाजातील त्रुटी दूर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे समजते. या अचानक भेटीमुळे कार्यालयातील कारभाराबाबत चर्चा सुरू झाली असून, नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तालुक्याचे लक्ष लागले. 

दरम्यान, उपमहानिरीक्षकांच्या भेटीनंतर कार्यालयातील वातावरणात खळबळ उडाली असून, आगामी काळात वरिष्ठ कार्यालयाकडून कोणती भूमिका घेतली जाते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. दुय्यम निबंधक कार्यालयातील तक्रारींवर कारवाई होणार का? उपमहानिरीक्षकांच्या भेटीनंतर नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या. अजित वीर यांच्या कामकाजाबाबत वाढत्या तक्रारी; चौकशी की केवळ औपचारिकता, यावर नागरिकांचा सवाल नागरिकांना शासकीय सेवा वेळेत व पारदर्शक पद्धतीने मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. 

गंगापूर दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजाबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. कार्यालयीन नोंदी व कामकाजाची तपासणी करून आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण प्राधान्याने करून सेवा वितरणात सुधारणा करण्यावर भर दिला जाईल.
- विजय भालेराव, दुय्यम निबंधक,
उपमहानिरीक्षक